Author Topic: हळू हळू श्वास माझे मिटत आहे......  (Read 708 times)

कळत नाही आज का,
मन माझे भरून येत आहे,
सारे सोबत असूनही का,
एकटेपणाची जाणीव होत आहे.....

खरच मी इतका वाईट आहे का,
जे माझे आपलेच मला दु:ख देत आहे,
आपलेपणाचा खोटा आव आणून,
विरहाच्या दरीत ढकलत आहे.....

असा काय गुन्हा झाला माझा,
कि पावलोपावली दुखच वाटेला येत आहे,
खरच मी इतका कठोर आहे का,
कि सगळेच दगडासारखे ओरबाडत आहे.....

कुणा कुणा कडून ठेऊ मी अपेक्षा,
कि अपेक्षा पूर्ण न होताच भंग पावत आहे.....
कुणावर ठेऊ मी विश्वास कुणाला म्हणू मी आपले,
सगळेच वेळे नुसार बदलत आहे.....

कसा जगू मी या निष्ठुर जगात,
कि न केलेल्या पापाचीच शिक्षा मला मिळत आहे,
अजून किती सोसू हृदयावर घाव मी,
कि एक जखम मिटताच नवीन जखम मिळत आहे......

अजून किती रे परीक्षा घेशील रे देवा माझी,
कि सारीच स्वप्ने माझी अधुरी राहत आहे,
थोडी तरी कर रे कदर माझी,
हळू हळू श्वास माझे मिटत आहे......

हळू हळू श्वास माझे मिटत आहे......

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)
स्वलिखित -
दिनांक १४-८-२०१३...
रात्री ११,३४... 
© सुरेश सोनावणे.....           
 
« Last Edit: August 15, 2013, 11:56:59 AM by ssonawane100@gmail.com »