Author Topic: मला ही वाटायचं.....  (Read 822 times)

मला ही वाटायचं.....
« on: August 15, 2013, 10:51:04 AM »
मला ही वाटायचं,
कधीतरी माझ्या अंगणात,
पाऊस होवून बरसावे तू.....

मला ही वाटायचं,
कधीतरी माझ्या आठवणीत,
दोन क्षण रडावे तू.....

मला ही वाटायचं,
कधीतरी माझ्या भेटीसाठी,
एकदातरी तरसावे तू.....

मला ही वाटायचं,
कधीतरी माझ्या हातात,
सुगंधीत फुलासारखे दरवळावे तू.....

मला ही वाटायचं,
कधीतरी माझ्यावर माझ्यापेक्षा,
जिवापाड प्रेम करावे तू.....

मला ही वाटायचं,
कधीतरी माझ्याशी खोटं खोटं होईना,
मनसोक्त भांडावं तू.....

मला ही वाटायचं,
कधीतरी ते भांडण मिटवून,
मला घट्ट मिठीत धरावं तू.....

पण ?????

माझ्या सर्व स्वप्नांची,
राखरांगोळी करुन गेलीस तू,
आयुष्यभर मला तडफडत मरण्यासाठी,
जिवंतपणी मरण देवून गेलीस तू..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता