Author Topic: तुझ्या आठवणीत मी अजून जगत आहे.....  (Read 606 times)

तू सोडून जाणार असे,
कधी वाटलेचं नव्हते,
तू सोडून गेलास तरी,
हे मन मानत नव्हते.....

तुझ्याबद्दल खरे जरा,
उशीराचं कळले मला,
म्हणून मी मनात,
एकटी खूप रडले होते.....

आठवले ते क्षण सर्व,
जेव्हा तुझ्यासोबत,
जगण्याचे स्वप्न पहिले होते.....

आजही त्या क्षणात,
मी स्वतःला कूठेतरी हरवत आहे,
तुझ्याचं आठवणीत मी,
स्वतःला वेड्यासारखी शोधत आहे.....

माझी आठवण आलीचं कधीतरी,
तर एकदाचं येऊन बघ,
पटत नसेलही कदाचित तुला......

पण ?????

तुझ्या आठवणीत मी अजून जगत आहे.....

तुझ्या आठवणीत मी अजून जगत आहे..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....