Author Topic: सूर झाले मुके  (Read 624 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
सूर झाले मुके
« on: August 15, 2013, 11:26:27 PM »
सूर झाले मुके अन
माझे संपले संगीत
शब्द विरुनि गेले
कसे म्हणावे त्यांस  गीत
दिलरुब्याची तार तुटली
येतील कसे त्यातून  सूर
दैव कोपले असताना
पालटु कसा हा मी  नुर
डाव उधळला असता
खेळावा कसा खेळ
साथी एक गेला असता
कसा नसावा हा मेळ
वैराण वाळवंटी ह्या
निर्झर कसा यावा
स्वर ऐकण्या त्याचा
ह्व्यांस कां धरावा
वसंताचा बहर गेला
कोकीळ कसा कुहूंकेल
मेघ नाहीं वर्षंले तर
मोर कसा नाचेल
पतझड आली जीवनी
आता बहर कसा यावा
सुमनांचा वास मधूर
कसा तिथे नांदावा
बंधनाच्या पार गेली
व्यथा जळते मनांत
भंगलेली स्वप्ने कधीं
कां सांधुनी येतात
               रविंद्र बेंद्रे 

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/sad-poem.html

Marathi Kavita : मराठी कविता