Author Topic: माफ कर मला मी तुला नाही मिळवू शकलो.....  (Read 946 times)

मी असाचं एकदा चालता चालता,
खूप खूप दूर निघून गेलो,
असाचं एकदा विचार केला,
अन् सर्वकाही विसरून गेलो.....

खूप प्रयत्न केले परत येण्याचे,
पण खूप वेळ झाला होता,
प्रेम म्हणजे काही नाही,
सर्व काही खेळ झाला होता.....

कधी तू माझ्यावर रुसलीस,
तर मी विदूषक बनून हसवायचो,
कधी तू माझ्यासाठी रडलीस,
तर मी तूला कुशीत घेवून रडायचो.....

तू दमलीस म्हणाल्यावर,
मी मुद्दामचं बसायचो,
तुझा नकळत तुझ्याचंकडे,
मी एकटक पाहत रहायचो.....

हे असं सारखं घडू लागलं,
सर्व कस आपोआपचं बिघडू लागलं,
तुझं माझं भेटणं कमी होता होता,
तुझं परख्यागत वागणं मलाही कळलं नव्हतं.....

नंतर तुझ्या मैत्रिणीने कळवलं,
कि तुझ्या घरी कोणीतरी हे सांगितलं,
तुझ्या घरच्यांचा तुझ्यावर खूप धाक होता,
पण तेवढचं 'प्रेम' या शब्दावर राग होता.....

खरचं खूप प्रयत्न केले परत येण्याचे,
पण खूप वेळ झाला होता,
प्रेम म्हणजे काही नाही,
सर्व काही खेळ होता.....

माफ कर मला मी तुला मिळवू नाही शकलो.....

माफ कर मला मी तुला नाही मिळवू शकलो..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....