Author Topic: माझे पहीले प्रेम अधुरेचं राहीले.....  (Read 971 times)

तो विसर गं वेडे,
मला कायमचे असे म्हणताचं,
अचानक नकळत काही क्षणातचं,
डोळ्यातून माझ्या अश्रूं बरसले.....

तो सर्व नाते बंध,
तोडून सोडून गेल्यापासून,
मी अपुर्ण तर होतीचं,
आता एक एकटीचं राहीले.....

तो फक्त माझाचं आहे,
हे माहीत असतानाही,
मी मात्र त्याच्यासाठी,
नेहमी परखीचं राहीले.....

जिवापाड प्रेम करुनही त्याच्यावर,
नकळत त्याने माझे मन मोडले,
खुप तळमळ करुनही जिवाची,
माझे प्रेम मला नाहीचं भेटले.....

कोवळ्या वयात मनाने जोडलेले,
एक जिवलग नाते आमचे,
त्याने क्षणाचा विसर न करताचं,
नकळत का असे मोडले.....

खूप अटापिटा केला त्याच्यासाठी,
खूप गयावया केला,
तो माझा व्हावा म्हणुन,
त्याच्या पायाही मी पडले.....

नाही समजल्या त्याला भावना माझ्या,
नाही समजले त्याला प्रेम माझे,
तो माझा नाहीचं हा विचार येताचं,
मी जीव ओरबाडून ढसाढसा रडले.....

खुप प्रयत्न केले,
खूप विनवण्या केल्या,
त्याला समजावण्यासाठी,
त्याने माझे काही एक ना ऐकले.....

शेवटी जिवंतपणी मरण्यासाठी,
एकटी टाकून फेकून गेला तो मला,
माझे पहीले प्रेम अधुरेचं राहीले.....

माझे पहीले प्रेम अधुरेचं राहीले..... :'( :'( :'(


_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....