Author Topic: तुझ्या आठवणीत मी रडत होते.....  (Read 752 times)

काल पावसाचे काही थेँब,

तुझ्यावरही पडले होते.....

ते पडणा-या पावसाचे थेँब नसून,

माझ्या डोळ्यातले वाहणारे अश्रूं होते.....

तुला एक वेळ भेटण्यासाठी,

मी क्षण क्षण मरत होते.....

भर उन्हात आभाळ दाटावे तसे,

मी मनातून पाझरत होते.....

खरं तर तुला विसरण्याचा,

मी खोटा प्रयत्न करत होते.....

तु समजलास पाऊस पडतोय,

पण ???

तुझ्या आठवणीत मी रडत होते.....

तुझ्या आठवणीत मी रडत होते..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....