Author Topic: जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल.....  (Read 1018 times)

जिथे जिथे जाशील तु,

तिथे तिथे तुला माझा भास होईल.....

कधी कधी खुप रडशील माझ्यासाठी,

जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल.....

नकळत न सांगता हसशील तु,

नकळत जेव्हा तुला जुने क्षण आठवतील.....

तु कधीच विसरु शकणार नाही मला,

येवढे प्रेम तुझ्या ह्रदयात ठेवून जाईल.....

एकांतात तडफडशील तळमळशील तु,

जेव्हा जेव्हा तुला रडण्यासाठी खांदा कोणी नाही देईल.....

प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी माझीच उणीव भासेल,

जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल.....

जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....