Author Topic: माझी आठवण आल्यावर.....  (Read 1478 times)

माझी आठवण आल्यावर.....
« on: August 18, 2013, 02:57:35 PM »
एका ब्रेकअप झालेल्या प्रियकराने प्रियासीसाठी,
लिहलेली अखेरची मनवेधक कविता...!!

माझी आठवण आल्यावर,
कधी तरी रडशील तु,
कधी तरी हसशील तु.....

माझी आठवण आल्यावर,
कधी तरी स्वतःवर चिडशील तु,
कधी तरी स्वतःशीच भांडशील तु.....

माझी आठवण आल्यावर,
कधी तरी तडफडशील तु,
कधी तरी तळमळशील तु.....

माझी आठवण आल्यावर,
खुप चांगला होता प्रियकर माझा,
कधी तरी असे म्हणशील तु.....

माझी आठवण आल्यावर,
कधी तरी एकटी पडशील तु,
कधी तरी चाचपडशील तु.....

माझी आठवण आल्यावर,
कधी तरी घुटमळशील तु,
कधी तरी बेचैन होशील तु.....

पण ???

तेव्हा निघून गेलो असेल मी,
या जगातून खुप खुप दूर,
देह माझा निवांत झाला असेल,
चिता जळत असेल माझी सारणावर,
निघेल श्वासांचा धूर.....

सा-या सुखाची होईल माती,
विरहाच्या दुःखाची झाली असेल राख,
डोळेही कायमचे बंद होतील,
या जगाचा अखेरचा निरोप घेतील.....

माझी आठवण आल्यावर,
कधी तरी प्रेमाला समजशील तु,
कधी तरी मला विसरशील तु..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १८-०८-२०१३...
दुपारी १२,१०...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


अशोक

  • Guest
Re: माझी आठवण आल्यावर.....
« Reply #1 on: August 18, 2013, 10:57:33 PM »
एका ब्रेकअप झालेल्या प्रियकराने प्रियासीसाठी,
लिहलेली अखेरची मनवेधक कविता...!!

१२३४५६७८९००९८७६५४३२१२३४५६७८९०१२३४५६७८९०

प्रेमभग्न मी युवा
लिहीत असे मी तुवा
मनोरंजक माझी कविता
करुनी मरणा-सरणाच्या बाता.

असे मी जरी आज प्रेमभग्न
होईल उद्या...
कुणा ना कुणाशी माझे लग्न
नि जाईन मी विसरून
माझ्या मरणा-सरणाच्या बाता
चिवडा-शंकरपाळी खाता खाता.Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
Re: माझी आठवण आल्यावर.....
« Reply #2 on: August 19, 2013, 12:16:01 PM »
suresh chhan n ashok eakach no re