Author Topic: जमलचं तर परत ये.....  (Read 983 times)

जमलचं तर परत ये.....
« on: August 18, 2013, 10:36:16 PM »
जमलचं तर परत ये.....

मला आपलसं करण्यासाठी,
पुन्हा I Love u बोलण्यासाठी,
आपलं अधुर स्वप्न साकारण्यासाठी,
मोडलेलं मन जोडण्यासाठी.....

जमलचं तर परत ये.....

मला पुन्हा मिठीत घेण्यासाठी,
जुने अनमोल क्षण जागवण्यासाठी,
तुझी बेभान अदा दाखवण्यासाठी,
सुकलेले फूल फुलवण्यासाठी.....

जमलचं तर परत ये.....

तुटलेल्या पाकळ्या जोडण्यासाठी,
मोडलेले घरटे जोडण्यासाठी,
तुटलेल्या ह्रदयाचे थांबलेले ठोके चालवण्यासाठी,
जुन्या आठवणी जागवण्यासाठी.....

जमलचं तर परत ये.....

स्पंदन बनुन ह्रदयाला धडकावण्यासाठी,
श्वास बनुन माझ्यात जीव आणण्यासाठी,
माझा एकटेपणा संपवण्यासाठी,
मला आपलं करुन परखं करण्यासाठी.....

जमलचं तर परत ये.....

मला पुर्णपणे बरबाद करण्यासाठी,
आपण बांधलेलं घरटं उध्वस्त करण्यासाठी,
आपला सोन्यासारखा संसार मोडण्यासाठी,
तु दिलेली खोटी वचने निभवण्यासाठी......

जमलचं तर परत ये.....

तुझं माझं प्रेम सिद्ध करण्यासाठी,
तु दाखवलेल्या स्वप्ने खोटी ठरवण्यासाठी,
तु घेतलेल्या शपथा तोडण्यासाठी,
माझे गमावलेले अस्थित्व परतवण्यासाठी.....

जमलचं तर परत ये.....

मला बावलट बोलण्यासाठी,
तुझा शाहणपणा दाखवण्यासाठी,
माझा चेहरा डोळ्यात भरण्यासाठी,
तडकलेले ह्रदय सावरण्यासाठी.....

जमलचं तर परत ये.....

माझ्या रिकाम्या ह्रदयातील जागा भरण्यासाठी,
जिथे तुझी आठवण नाही येणार अशी जागा दाखवण्यासाठी,
तुझे मनात असलेले चित्र पुसण्यासाठी,
तु दिलेल्या आठवणी मिटवण्यासाठी.....

जमलचं तर परत ये.....

मला पुन्हा रडवण्यासाठी,
प्रेमाची भिक माझ्या झोळीत टाकण्यासाठी,
माझ्या भावनांनशी खेळण्यासाठी,
माझे प्रेम खरे की खोटे ठरण्यासाठी.....

जमलचं तर परत ये.....

माझे विरहात होणारे हाल पाहण्यासाठी,
माझ्या देहावर अंतिमसंस्कार करण्यासाठी,
माझ्या देहाला कवटाळून रडण्यासाठी,
माझ्या जळून झालेली राख ह्रदयाला लावण्यासाठी.....

जमलचं तर परत ये.....

जमलचं तर परत ये..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता