Author Topic: मी जग सोडुन गेलेलो असणार.......  (Read 726 times)

शापित पंखाचे तुला हे अखेरचे पत्र :
 
 खुप प्रेम करतो तुझ्यावर
 वेळ मात्र थांबवु शकत नाही..
 
 एक दिवस येईल ,मी जग सोडलेलं असणार
 तुला मात्र उशिरा कळेल
 कारण माझे मलाच कळलेलं नसणार......
 
 रडशील तु पाहशील जेव्हा
 तुझ्या फोनमध्ये नंबर माझा
 आठवत बसशील एकटी तु सुन्या त्या जागेवर........
 
 पण....
 माझे हसु अन माझे शब्द
 कानी तुझ्या पडणार नाही
 कारण....
 
 मी जग सोडुन गेलेलो असणार......
 
 तुला छळणारा कुणी नसेल ....मी गेल्यावर
 फोन करुन आठवण येते म्हणणारा कुणी नसेल
 तुला ओरडणारा कुणी नसेल....मी गेल्यावर
 
 आठवेल माझे तुला चिडवणे
 स्वत:ला दुखावुन तुझ्या ओठांवर हसु आणणारा
 कुणी नसेल.... मी गेल्यावर
 
 आठवुन तुझे डोळे भरतीलही
 आसवे डोळ्यांतुन ओसंडुन वाहु लागतील
 
 फक्त एक फुल ठेव देहावर अखेरचे माझ्या
 कारण..
 मी जग सोडुन गेलेलो असणार......
 
 मी जग सोडुन गेलेलो असणार.......
 -
 लेखन: शापित पंख™
 ©प्रशांत डी शिंदे 
 
 दि.१७-०८-२०१३