Author Topic: ती बेवफा माझ्या आयुष्यात येण्या अगोदर.....  (Read 909 times)

ख-या प्रेमात दगा धोका बेवफाई मिळालेल्या,
आणि प्रियासीने त्याच्याशी लग्न न करता,
दुस-याशी संसार मांडलेल्या प्रियकराची ह्रदयद्रावक व्यथा.....

थोडातरी विचार करायला हवा होता,

मला विसरण्या अगोदर.....

मी लिहलेले प्रेमपत्र,

माझे फोटे जाळण्या अगोदर.....

तुझे हात का नाही,

थरथरले असे करताना.....

कुण्या परख्याच्या नावाची,

हातावर मेँहन्दी सजवण्या अगोदर.....

तुझ्या डोळ्यातून माझ्यासाठी,

एक थेँबही नाही बरसला.....

तुझ्या कठोर ह्रदयातून,

माझे प्रेम मिटवण्या अगोदर.....

किती वचने दिली होतीस,

किती शपथा खाल्ल्या होत्यास.....

तू कुण्या परख्या सोबत,

लग्नाच्या मांडवात बसण्या अगोदर.....

माझ्या जिवनात कोणतेही,

दुःख नव्हते प्रिय मित्रांनो.....

ती बेवफा माझ्या आयुष्यात येण्या अगोदर.....

ती बेवफा माझ्या आयुष्यात येण्या अगोदर..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
kadak re mitra eakdum chhan

Offline vinod.patil.12177276

  • Newbie
  • *
  • Posts: 45
तुझे हात का नाही,
थरथरले असे करताना.....
कुण्या परख्याच्या नावाची,
हातावर मेँहन्दी सजवण्या अगोदर......छान ...