Author Topic: देवानेही तुला मला सोडून जाण्याचे वरदहस्त दिले.....  (Read 735 times)

खुप प्रेम होते तुझे माझ्यावर,

तरी ही मी प्रेम तुला जरा जास्त केले.....

तुझ्या दिसण्यावर लाजण्यावर,

माझे महागडे शब्दही मी स्वस्त लिहले.....

नाही समजले प्रेम तुला माझे,

म्हणुनच तु मला उध्वस्त केले.....

माझ्या मनाच्या भावनेशी खेळण्यात,

तुझे दिवस मस्त गेले.....

मला सोडून खुश आहेस तु,

माझे तर सारे आयुष्यच व्यस्त झाले.....

तरीही मी काही बोललो नाही तुला,

कारण ???

देवानेही तुला मला सोडून जाण्याचे वरदहस्त दिले.....

देवानेही तुला मला सोडून जाण्याचे वरदहस्त दिले..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....