Author Topic: तुला विसरण्यासाठी मी तुला रोजच आठवतो.....  (Read 863 times)

आपण पाहीलेल्या स्वप्नांना,
जागेपणीच मी जागवतो.....

तुझ्या आवडीच्या लाल रंगात कोणी दिसलं तर,
त्या व्यक्तीतही तुझाच भास होतो.....

तुझ्यावर लिहून कविता,
शब्दांना मी रडवतो.....

जुन्या क्षणांना उराशी कवटाळून,
मनात मी तळमळतो.....

तु आठवलीस कधी तर,
स्वतःवरच मी रागावतो.....

प्रेमाची न मिटणारी तहान,
आंसवे पिवून मी भागवतो.....

तुझे ते गोड हसणे आठवताच,
नकळत मी ओठांना हसवतो.....

खरच नाही कळत मला,
का मी असा वेडेपणा करतो.....

तु नसण्याची खुप उणिव जाणवते मला,
अक्षरशा स्वतःलाच मी फसवतो.....

कारण ?????

तुला विसरण्यासाठी मी तुला रोजच आठवतो.....

तुला विसरण्यासाठी मी तुला रोजच आठवतो..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....