Author Topic: माझ्या जळणा-या देहावर फक्त प्रेमाचे दोन अश्रूं गाळून जा.....  (Read 1041 times)

तिरडीवर माझ्या प्रेमाचे,
दोन फूले वाहून जा,
निष्पाप माझ्या देहाला,
एकदातरी डोळे भरुन पाहून जा.....

आयुष्यभर झुरलो गं,
प्रिये फक्त तुझ्याचंसाठी,
तु दिलेल्या प्रेमाची,
आज राखरांगोळी होताना पहा.....

आयुष्यभर खुप,
मुलांना फसवलंस गं तु,
आता तरी सखे,
थोडीफार तरी सुधारुन जा.....

आता काहीचं नाही,
उरले गं माझे,
माझ्या देहाची होणारी माती,
तु ह्रदयाला लावून पहा..

आयुष्यभर रडलो गं मी,
प्रिये फक्त तुझ्याचंसाठी,
माझ्यासाठी फक्त एवढेचं कर गं.....

माझ्या जळणा-या देहावर
फक्त प्रेमाचे दोन अश्रूं गाळून जा.....

माझ्या जळणा-या देहावर
फक्त प्रेमाचे दोन अश्रूं गाळून जा.....  :'(  :'(  :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २३-०८-२०१२...
सकाळी ०२,०३...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

  • Full Member
  • ***
  • Posts: 578
  • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध