Author Topic: ती आजही माझी वाट पाहत असेल.....  (Read 879 times)

आमचा ब्रेकअप झाल्यापासून,
मनातल्या मनात ती आजही झुरत असेल.....

मी दिलेल्या आठवणी आठवून,
कदाचित ती आजही रडत असेल.....

माझे खरे प्रेम होते तिच्यावर,
हे तिला आजही कळून चुकत असेल.....

माझ्या सहवासातील अनमोल क्षणांची,
तीला आजही कमतरता जाणवत असेल.....

प्रेमात मी केलेल्या त्यागांचा,
कदाचित तिला विसर पडला असेल.....

मी आज जगतोय की मरतोय या जगात,
हे कदाचित तिला माहीतही नसेल.....

कोण जाणे काय कुठे अन् कसे,
ती आजही माझी वाट पाहत असेल.....

ती आजही माझी वाट पाहत असेल.....  :'(  :'(  :'(

_____/)___/ )______./¯”"”/ ’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....