Author Topic: जमत नाही कविता .........  (Read 1103 times)

जमत नाही कविता .........
« on: August 22, 2013, 04:59:13 PM »
जमत नाही आता कविता
काय  लिहावं  तुझ्यावर
तू  नाहीस  आयुष्यात माझ्या
अन बघ शब्द ही रुसलेत माझ्या ह्या लेखणीवर
लिहावे  काय  मी  पान ओले  होतं
माझ्या अगोदर  त्याच्याच  डोळ्यांत  पाणी  येतं
कविता  लिहून  सजवणारा मी
आज  एकही कविता लिहत नाही
कारण तुझा  तो  सुंदर  चेहरा 
माझ्या नजरांना आता  कधीच  दिसत नाही

जमत नाही   कविता
मी कसे  तुला  विसरायचे
तुला  आठवतो  अन सांगतो  स्वतःलाच
आता एकटेपणीच आयुष्य जगायचे ..........

जमत नाही  हे  एकटेपण
जमत नाही दुसरे आयुष्यात  येणं
तुझी  जागा  हृदयातली माझ्या
असेच कुणासही राहायला देणं..........

जमत नाही गं   आता  खरेच   कविता लिहणे
तुझ्या  वाटेवर  डोळे माझे
आसवांना  थांबशील कधी  रे  विचारणे
खरेच  आता जमत नाही ..............   
-
लेखन: शापित पंख™
©प्रशांत डी शिंदे
Marathi Kavita : मराठी कविता


Offline Priyanka Jadhav

  • Newbie
  • *
  • Posts: 35
  • Gender: Female
  • माझ्या कवितांचे प्रेर्णास्तान, तूच!
Re: जमत नाही कविता .........
« Reply #1 on: August 23, 2013, 01:16:23 PM »
जमत नाही  हे  एकटेपण
जमत नाही दुसरे आयुष्यात  येणं
तुझी  जागा  हृदयातली माझ्या
असेच कुणासही राहायला देणं.......... :(
:(

majhya favorite lines from ur kavita.. Sundar ahe kavita..


Re: जमत नाही कविता .........
« Reply #2 on: August 28, 2013, 02:55:09 PM »
जमत नाही  हे  एकटेपण
जमत नाही दुसरे आयुष्यात  येणं
तुझी  जागा  हृदयातली माझ्या
असेच कुणासही राहायला देणं.......... :(
:(

majhya favorite lines from ur kavita.. Sundar ahe kavita..


dhanyvad priyanka