Author Topic: आज ती ही मतलबी झाली.....  (Read 1161 times)

आज ती ही मतलबी झाली.....
« on: August 24, 2013, 02:56:55 PM »
आज ती ही मतलबी झाली,
जी कधी माझ्यावर जिवापाड,
खरं प्रेम करत होती.....

आज ती ही मला परखी झाली,
जी कधी माझ्यासाठी झुरत होती.....

आज ती ही खोटी वागली,
जी आयुष्यभर साथ देण्याची,
माझ्या शपता खात होती.....

तुझी खुप आठवण येते रे,
जी नेहमी असे म्हणत होती.....

तुला पहावसं वाटतय रे,
जी हे आतुरतेने सांगत होती.....

तुझ्याशिवाय करमत नाही रे,
जी असे बोलत होती.....

नाही जाणले तिने मन माझे,
जी माझ्या ह्रदयात राहत होती.....

नाहीच कळले तिला प्रेम माझे,
जी माझी न राहता दुस-याची झाली होती..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २४-०८-२०१३...
दुपारी ०१,४८...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता