Author Topic: तुझी आठवण आली की.....  (Read 1311 times)

तुझी आठवण आली की.....
« on: August 24, 2013, 03:16:26 PM »
तुझी आठवण आली की,
मला माझीचं रे खुप चिड येते,
तुझी आठवण आली की,
मन माझे नकळत गहीवरुन जाते.....

तुझी आठवण आली की,
अचानक पापणीला पाझर फुटते,
तुझी आठवण आली की,
रोजचं तुझ्यासाठी मनातून झूरते.....

तुझी आठवण आली की,
ईकडे तिकडे तुला वेड्यासारखं शोधत फिरते,
तुझी आठवण आली की,
मन माझे नकळत एकांतात जाते.....

तुझी आठवण आली की,
गोड क्षणांना आठवून हसत असते,
तुझी आठवण आली की,
तुझ्याशिवाय आयुष्य नकोसे वाटते.....

तुझी आठवण आली की,
स्वःताला संपवण्याचा प्रयत्न करते,
तुझी आठवण आली की,
पुन्हा नकळत तुझ्या प्रेमात पडते.....

तुझी आठवण आली की,
तु दिलेले खोटे वचन आठवते,
तुझी आठवण आली की,
का केले मी खरे प्रेम यावर पसतावते.....

तुझी आठवण आली की,
खरचं रे खुप मन माझे दुःखते,
तुझी आठवण आली की,
मला आजही रडायला येते.....

मला आजही रडायला येते.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता