Author Topic: मनाच्या एकांतात तुझी खुप आठवण येते.....  (Read 1898 times)

मनाच्या एकांतात तुझी खुप आठवण येते,
मनाला माझ्या अस्वस्थ करते.....

आठवून तुझ्या माझ्या जुन्या आठवणीँना,
क्षणातच ढसाढस रडू येते.....

खरच मी कुठे चूकलो ही असेल,
पण माझे प्रेम खोटे नव्हते.....

कसे सांगु तुला कशा व्यक्त करु भावना माझ्या,
की माझे तुझ्यावर किती प्रेम होते.....

कसे गं मी समजावू तुला,
ह्रदयात ही धडकन बनुन तुच स्पंदते......

एकदातरी बोलणे ऐक माझे,
श्वासा श्वासात तुच गंधासारखी दरवळतेस.....

मन काहीच नाही ऐकत माझे,
ते ही वेडे तुलाच मागते.....

खरच एक क्षणही राहवत नाही तुझ्याविणा,
तु आठवताच टचकण डोळ्यात पाणीच येते..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २५-०८-२०१३...
सांयकाळी ०७,३५...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


अवंतिका

  • Guest

तु मात्र रडत बसलीस.....
« on: August 17, 2013, 09:23:29 PM »

खोटं बोलून माझं मन मोडून,
तु बरी जगलीस.....

मी तुझा आपला असताना,
तु मात्र परखी झालीस.....

खेळलीस भावनांचा खेळ,
प्रेमात मात्र हारलीस.....

मी हारुन ही जिँकलो,
तु स्वतःला दोश देत बसलीस.....

मी दुःखात रडत असताना,
तु मात्र हसत राहीलीस.....

माझे खरे प्रेम अमर झाले आज,
तु मात्र कमनशिबी ठरलीस.....

मी माझ्या चुकातून शिकत गेलो,
तु मात्र चुकावर चुका करत गेलीस.....

मी आता सुखी आहे एक एकटा,
तु मात्र रडत बसलीस.....

© सुरेश सोनावणे