Author Topic: अशीच असते आठवण ...  (Read 960 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
अशीच असते आठवण ...
« on: August 28, 2013, 10:50:30 AM »
आठवण ...
अशीच असते आठवण ...
नकळत येऊन पापणी ओली करून जाते ...
गालावर ओघळलेल्या थेंबावर तिचे प्रतिबिंब देऊन जाते ..
अशीच असते आठवण ...
एक अनामिक हुरहूर
अन मनातले काहूर ...
आसुसलेल्या डोळ्यांना तिचा भास देऊन जाते ...
अशीच असते आठवण ...
पाहिलेले एक दिवास्वप्न
त्यात मन रमलेले असणं...
स्वप्नांना आसवांत वाट मोकळी करून देते ...
अशीच असते आठवण .....
तिची वाटणारी ओढ
तिला माघारी बोलावणारे ओठ
ती नाही येणार परत असं कानात सांगून जाते ....
अशीच असते आठवण ...
नकळत येऊन पापणी ओली करून जाते ...
गालावर ओघळलेल्या थेंबावर तिचे प्रतिबिंब देऊन जाते.....
हो अशीच असते आठवण ........
--------पाउसवेडा

Marathi Kavita : मराठी कविता