Author Topic: मीच माझा सोबती ....  (Read 827 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
मीच माझा सोबती ....
« on: August 28, 2013, 10:51:32 AM »
गुलाबी थंडीत शहारून गेले दवबिंदू पानांवरले,
धुंद धुक्यात हरवून गेले उष्ण श्वास अन वा-यावरले ..........
दृष्ट काढून टाकली मी त्या फुलांनी ज्यांनी तुला पाहिले,
त्या फुलांना गंध मिळाले ज्यांना तू स्पर्शले......
अशा कोवळया उन्हातही रूप तुझे चमचमले,
भर उन्हातही तेव्हा जरासे मग रिमझिमले....................
तुझ्या नजरेत चांदणे असे आहे,
चंद्राचेही श्वास त्यात असे मग मोहरले....
त्याच श्वासांत आज गुंतून गेल्या आठवणी अशा
अन त्या गर्दीत मग मन माझेही काहुरले...................
स्पर्श तुझा जणू शहारा पहिल्या सरीचा
चाहूल तुझी अशी जणू आभास इंद्रधनुचा ...
सळसळणारा वारा तुझ्या केसांमध्ये असा गुंतला
तुझीच ओढ होती जणू त्याला
तुझ्या भोवताली तो ही जरासा घुटमळला...
रमले सारे तुझ्या भोवती
वारा,चंद्र,पाउस तुझ्यासोबती..
एकटे मला सोडूनी गेले सारे
आता मीच माझा सोबती
मीच माझा सोबती ....
-----पाउसवेडा

Marathi Kavita : मराठी कविता