Author Topic: पाउस ...  (Read 700 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
पाउस ...
« on: August 28, 2013, 10:56:00 AM »
पाउस ....
पाउस तिचा ...
तिच्या हसण्याचा
तिच्या रुसण्याचा
ती माझी असण्याचा ...

पाउस ...
तिच्या स्पर्शाचा
तिच्या उबदार मिठीचा
त्यामधल्या माझ्या स्वप्नांचा ...

पाउस ...
हातांमधल्या हातांचा ..
तळहातावर उमटलेल्या रेषांचा ....
त्या रेषांमधल्या वचनांचा ...

पाउस ...
तिच्या डोळ्यांमधल्या आसवांचा
तो झेलून घेणा-या माझ्या ओंजळीचा
अन त्यात वाहून जाणा-या माझ्या पापण्यांचा ...

पाउस ...
तिच्या दूर जाणा-या पावलांचा
अस्पष्ट होत जाणा-या सावल्यांचा
अन तिला अडवू पाहणा-या शपथांचा ...

असा हा पाउस ...
तिच्या येण्याचा
तिच्या जाण्याचा
अन त्यानंतरच्या माझ्या एकटेपणाचा .......

पाउस ...............
----- पाउसवेडा

Marathi Kavita : मराठी कविता