Author Topic: तुझ्याविना ....  (Read 1368 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
तुझ्याविना ....
« on: August 28, 2013, 07:10:30 PM »
तुझ्याविना ...
चांदण्यांची आरासही वाटते भयाण
चंद्र एकाकी अन डोळ्यातले पाण्याचे उधाण
मन असे उदास विरक्त असा जीवनी
जणू सैरभैर काजवे फिरतात रानीवनी
तुझ्याविना ....

पाउस मुसळधार काप-या धारांचा
सल असे मातीला फुटलेल्या गारांचा
वेचत आहे गंध मातीचा सांडलेला
सोडून जातोय खेळ प्रेमाचा तू मांडलेला
तुझ्याविना ....

संध्याकाळ जराशी केविलवाणी भासते
कवडसे उन्हाचे रणरणते दिसते
वारा सैरावैरा धावतोय तुला शोधण्या असा
पोरका जीव जणू पाखराचा फुलाविना जसा
तुझ्याविना ....

स्वप्न होतेस तू माझे
कधीही न पूर्ण होणारे
धावलो किती तुझ्यासाठी पण
अंतर कधीही न संपणारे ....
तुझ्याविना.....
----पाउसवेडा

Marathi Kavita : मराठी कविता