Author Topic: माझी कमतरता नक्की जाणवेल तुला.....  (Read 1860 times)

माझ्या भावनांनशी खेळण्याचा,
अधिकार मीच दिलाय ना तुला.....

म्हणुनच मांडून प्रेमाचा बाजार तु,
माझ्या बरबादीचा कट रचला.....

उध्वस्त केलेस घरटे माझे,
आधारही त्याचा मोडीत काढला.....

नाही ना समजत तुला मन माझे,
नाही समजणार माझ्या भावना तुला.....

आज ना उद्या एकदातरी,
माझी कमतरता नक्की जाणवेल तुला.....

माझी कमतरता नक्की जाणवेल तुला.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ३१-०८-२०१३...
दुपारी ०४,४१...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


विकास

  • Guest
आज ना उद्या एकदातरी,
माझी कमतरता नक्की जाणवेल तुला.....
मी थोर प्रेमवीर
रघुवीराचा अवतार
तू पाषाणहृदयी नार
चालवलीस नरड्यावर माझ्या नंगी तव तलवार.