Author Topic: तुझा मी कधी झालोच नाही..  (Read 1534 times)

Offline शापित राजकुमार

  • Newbie
  • *
  • Posts: 15
  • Gender: Male
  • शापित राजकुमार किंवा एक दीवना था
तुझा मी कधी झालोच नाही..
« on: September 03, 2013, 10:10:48 AM »
तुझ्यासाठी झुरतांना,
तुझ्यावर प्रेम करतांना,
मी सर्व काही विसरलो,
तुझ्यात पुर्णपणे गुंतलो,
पण तुझा मी झालोच नाही...

तु फक्त माझीच आहे,
माझीच राहणार करत राहीलो,
स्वपनात ही तुला स्वताची,
सावलीच समजत राहीलो,
पण तुझा मी कधी झालोच नाही...

मी तुझ्यासाठी जगतांना,
सर्वस्व तुला अर्पितो,
स्वत:हा तु माझी नसतांना,
स्वपनात तुलाच माझी बनवतो,
पण तुझा मी कधी झालोच नाही..

... सिध्दार्थ पाटील™
.. दि. १९.०७.२०१३ ..

Marathi Kavita : मराठी कविता


प्रधान

  • Guest
Re: तुझा मी कधी झालोच नाही..
« Reply #1 on: September 03, 2013, 11:49:15 PM »

स्वप्नसृष्टीत आजच्या माझ्या
"मी तुझ्यासाठी जगताना,
सर्वस्व तुला अर्पितो,
स्वत: तू माझी नसताना,
स्वप्नात तुलाच माझी बनवतो"

होईल दोनतीन वर्षात येत्या
"शुभमंगल" माझे कोणाशीतरी
होईल संसार चारचौघांसारखा माझा
बायको, छोकरा-छोकरी, नोकरी