Author Topic: इथे जळत असेल कुणी  (Read 1368 times)

Offline Maddy_487

  • Jr. Member
  • **
  • Posts: 145
  • Gender: Male
इथे जळत असेल कुणी
« on: September 06, 2013, 08:41:08 PM »
आरशात बघुन हसताना ......
असे अवेळी सजताना...
तुलापहिल..... कुणी.....
गालावरल्या रंगाचा अर्थ...
तुला मागेल कुणी.....

डोळ्यातला भाव लपवताना....
स्वतःला जरा सावरताना.....
तुला ओळखेल कुणी.....
तुझ्या भावनाना अलगद...
तिथे टिपेल कुणी....

अखेरचा दिवा मालवताना...
भरलेले डोळे पुसताना....
तुला अडखळेल कुणी...
तुझ्या नकळत तुलाच....
माझाशिवाय बाहुत घेईल कुणी....

अस रात्र रात्र जागताना....
त्याच आठवणी मोजताना....
तिथे सोबत असेलही कुणी....
पण नभातल्या चंद्रा प्रमाणे...
इथे जळत असेल कुणी...
                      --अनामिक

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsandy9

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
Re: इथे जळत असेल कुणी
« Reply #1 on: September 11, 2013, 12:53:26 PM »
far chan shabd ahet..