Author Topic: एक कविता तुझ्यासाठी  (Read 1864 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
एक कविता तुझ्यासाठी
« on: September 06, 2013, 09:17:00 PM »
एक कविता तुझ्यासाठी
मी कधी लिहिली होती
जी न कधी तुजला परि
मी दाखवली होती 
तसे कवितेत माझ्या
नवे असे काही नाही
तीच प्रीती तेच झुरणे
कळ्या फुले देणे काही
आता या कवितेला
तसा काही अर्थ नाही
तुझ्या जगात मी अन
माझ्या जगात तू नाही
कळत नाही तरी का
हि कविता जपतोय मी
वेडेपणाला हसतोय माझ्या
का आत कुठे रडतोय मी

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 12:55:32 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Re: एक कविता तुझ्यासाठी
« Reply #1 on: September 07, 2013, 12:24:23 AM »
कळत नाही तरी का
हि कविता जपतोय मी
वेडेपणाला हसतोय माझ्या
का आत कुठे रडतोय मी

mast..

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: एक कविता तुझ्यासाठी
« Reply #2 on: September 08, 2013, 06:34:56 PM »
thanks ,

Offline Suhas Phanse

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
 • आपले स्वागत आहे.
  • Suhas Phanse's Creations
Re: एक कविता तुझ्यासाठी
« Reply #3 on: September 08, 2013, 10:45:32 PM »
आपलं साधं पेन हरवलं तरी आपला पेनचा विरह निदान दुसरं पेन मिळेपर्यंत आपल्याला सतावत राहतो, नाही का!