Author Topic: मृगजळ  (Read 923 times)

Offline sweetsandy9

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
मृगजळ
« on: September 11, 2013, 12:43:54 PM »
                    मृगजळ

कधीकाळी माझ्या हृदयातले शब्द तुझ्या ओठी होते,
तर कधीकाळी तुझ्या केसातले गंध माझ्या श्वासी होते..

कधीकाळी तुझ्या मनातल्या चित्रात माझे रंग होते,
तर कधीकाळी माझे स्पर्श तुझ्या अंगावरील शहाऱ्यात होते..

    स्वप्नांतील जगासारख त्यावेळी ते सर्व भासत होते
      पण आता कळतंय ते फक्त एक मृगजळ होते..
« Last Edit: September 11, 2013, 03:07:56 PM by sweetsandy9 »

Marathi Kavita : मराठी कविता