Author Topic: लग्नपत्रिका  (Read 1578 times)

Offline sweetsandy9

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
लग्नपत्रिका
« on: September 17, 2013, 10:17:29 AM »
लग्नपत्रिका

तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली
थर-थरत्या हातानी त्या वरची आसवे पुसली
एक अश्रू नेमका तिच्या नावावरच पडला
नाव खराब होईल म्हणून पुसणारा हात अडला
दोन-चार आसवं तिच्या आईच्या नावावर पण पडली होती
जिच्याकडे हात जोडून "ती" माझ्यासाठी रडली होती
काही घसरलेली अक्षरे लग्नस्थळ दर्शवत होती
अगदी त्याच्याच समोर आमची भेटण्याची जागा होती
आहेर आणु नये यावर ही थोडा ओलावा होता
तिच्या  बर्थडे साठी मी माझा मोबाईल विकला होता
सगळी मित्र मंडळी माझ्यावर हसली
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली

                            - Unkown Author
« Last Edit: September 17, 2013, 10:18:20 AM by sweetsandy9 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: लग्नपत्रिका
« Reply #1 on: September 21, 2013, 01:31:25 PM »
छान कविता !!अप्रतिम !!  :) :) :) :)