Author Topic: जाताना......  (Read 1250 times)

Offline abhi manchekar

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
जाताना......
« on: September 20, 2013, 02:07:22 PM »
जाताना.......

जाताना क्षणभर त्यांचे पाऊल अडखळले होते,
तेव्हा मनास माझ्या कोडे उलगडले होते.....

आता सोबत आहे तुझिया आटवणींची,
असले शब्द तयांच्या ओठी घुटमळले होते....

रोखून निग्रहाने धरले जरी तयांनी,
काठांस पापण्यांच्या पाणी अवतरले होते.....

मी ही पुरवून गेलो हट्टास ह्या अखेरी,
घर गावातले तयांच्या माझे कोसळले होते....

सांगू नकोस त्यांना भलत्या दिशेस गेलो,
त्यांच्या हवेत माझे जगणे भरकटले होते.......

सरली बरीच वर्षे भेटीस ह्या "अमुर्ता",
तरीही त्या क्षणाने मजला थांबवले होते.....

                        अमुर्त.... अभिजीत मणचेकर...... :(


Marathi Kavita : मराठी कविता