Author Topic: राहिल्यात फक्त आणि फक्त आठवणी  (Read 1957 times)

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
बसलं एकांतात कधी कि ते
जुने दिवस आठवतात
बालपणीच्या आठवणी पुन्हा
नव्याने साद घालू लागतात…!! :)

ती शुक्रवारची रात्र म्हणजे आमच्या
आनंदाला आलेली भरती असायची
कारण त्या रात्री दूरदर्शन वर एक
मस्त हिंदी फिल्म असायची…!! ;D

शनिवारी रात्री जागतांना मात्र
खूप जास्त फार भीती वाटायची
कारण त्या रात्री फिल्मच्या
आगोदर 'आप बीती' असायची…… !!

ती रविवारची दुपार म्हणजे
आम्हा सगळ्यांची चंगळ असायची
कारण शक्तिमान बघायला आमची
सगळी GANG एकत्र यायची…!! 8)

शक्तिमान नंतर ती आर्यमान
लागली कि नेमकी लाईट जायची
आणी मग वायरमनच्या अक्ख्या
खानदानावर शिव्यांची बरसात व्हायची…!! :'(

आठवतात ते दिवस अनं जुन्या
आठवणींचा एक हुंदका येतो
आणी नकळत अश्रूंचा एक
थेंब टपकन या गालावर पडतो...!! :( :(

@सतीश भूमकर,शेवगाव
« Last Edit: September 22, 2013, 11:15:07 PM by Satish Bhumkar »

Marathi Kavita : मराठी कविता


Kiran Patil

 • Guest
" मग वायरमनच्या अक्ख्या
खानदानावर शिव्यांची बरसात व्हायची"..HA HA HA

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
thank u
« Last Edit: December 01, 2013, 04:41:17 AM by सतीश भूमकर »