Author Topic: आज मला घरात जावेसे वाटत नाही....  (Read 1195 times)

Offline abhi manchekar

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
आज मला घरात जावेसे वाटत नाही....

आज मला घरात जावेसे वाटत नाही,
सगळयांच्या प्रश्नांचे अगणित वार होतील,
उत्तरांची ढाल कमकुवत आहे....
आज मला घरात जावेसे वाटत नाही....

जेवणातला बदल आईच्या लक्षात आलाय,
विचारते, ' बरं वाटत नाहीये का?' म्हणून....
नाही गं म्हणून टाळतो मीही....
आज मला घरात जावेसे वाटत नाही....

हल्ली मोबाईलचा वापर कमी झालाय,
रिचार्जसाठी फारसे पैसेही मागत नाही...
बराचसा वेळ मोकळाच असतो,
आज मला घरात जावेसे वाटत नाही....

झोपेने पुकारलेला संप आजीच्या लक्षात आलाय,
तिच्या 'बटव्यातल्या' औषधांचा माझ्यावर प्रयोगही झाला,
माझ्या नकळत.....
आज मला घरात जावेसे वाटत नाही....

जाऊदे रे, सोड ना यार, विसर ना आता.....
मित्रांची सहानुभुती टोचतेय..
आज मला घरात जावेसे वाटत नाही....

मागे तिला म्हणालो होतो,
तु आलीस की घर पुर्ण होईल माझे....
आता ती कधीच येणार नाही,
आणि मला घरात जावेसे वाटत नाही.... :(