Author Topic: कसे सावरू मनाला नेमका हाच पेच आहे...........  (Read 1173 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
का प्रत्येक श्वासात तिचीच आस आहे
मिटलेल्या पापण्यांत का तिचाच आभास आहे...........
का तिची वाट बघत मन अजूनही त्याच ठिकाणी स्तब्ध आहे
का भावना गोठलेल्या आहेत अन डोळे निशब्द आहेत..........
का अजूनही पाउस कोरडा आहे अन का संध्याकाळ धूसर
का अजूनही स्वप्नं जागी आहेत अन का पुस्तकातले गुलाबाचे फूल ओलसर...........
का आहे ह्रदय असे थंड अन का आहेत श्वास उष्ण
का अजूनही प्रश्न अनुत्तरित आहेत अन का प्रत्येक उत्तरामागे एक नविन प्रश्न..............
सरल्या क्षणात का अजूनही रूप तिचे तेच आहे
कसे सावरू मनाला नेमका हाच पेच आहे.....................