Author Topic: तू असताना.........  (Read 1433 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
तू असताना.........
« on: September 28, 2013, 08:12:08 PM »
तू असताना कधीच वाटलं न्हवत
तुझ्याशिवाय आयुष्य एवढं भयाण असेल
तुझ्यासोबतचे सर्व क्षण एवढे अंगावर येतील
खरंच तू असताना कधीच न्हवत वाटलं .............
तुझी वाट बघताना तेव्हा एक गंमत होती
पण आता तीच गंमत जीव कासावीस करेल न्हवत वाटलं
भातुकलीचा खेळ खेळता खेळता
राणी अर्ध्यावरती सोडून जाईल न्हवत वाटलं
खरंच तू असताना कधीच न्हवत वाटलं ....
पावसाचा प्रत्येक थेंब तुझ्या ओंजळीत झेलायचीस तू
पण माझ्या डोळ्यांतला पाऊस झेलायला तू नसशील न्हवत वाटलं
रखरखीत उन्हात माझी सावली व्हायचीस तू
पण आता पाऊसही असा रखरखीत वाटेल न्हवत वाटलं
खरंच तू असताना कधीच न्हवत वाटलं ....
तूच माझे आयुष्य आहेस असे बोलता बोलता
आयुष्य माझे इतके कमी असेल कधीच न्हवत वाटलं
खरंच तू असताना.........

Marathi Kavita : मराठी कविता