Author Topic: ती भेट अखेरची होती .........  (Read 1909 times)

ती भेट अखेरची होती .........
« on: October 01, 2013, 11:56:36 AM »
भेट अखेरची होती
ओळख मात्र जुनीच होती ...........

कालची रात्र  अन  दिवसही माझ्यासाठी शापितच  होती
कारण जिच्यावर जीवापाड  प्रेम केले
तिच्या गळ्यात आज दुसऱ्याचेच मंगळसुत्र  होते .........

कपाळ ही कुंकवाने भरलेले
ती आता सौभाग्यवती होती
अन नेहमीसारखेच माझे नशीब शापित होते  ..........

कालपर्यंत  माझ्याच मिठीत जगणारी
माझ्यासोबत आयुष्याचे वाट चालणार म्हणणारी
माझ्या डोळ्यांत एक थेंब न पाहणारी
आज मात्र  गप्प होती
मला  विसरून जा 
आता तुला माझ्याशिवाय  जगायचं म्हणत
माझ्या  डोळ्यांतली आसवे
माझ्या इतकेच   तिलाही तेवढेच  भिजवत होती ........

मला ठाऊक होतं  ती  आजही  माझीच होती
नशिबाचे  युध्द होते हे
अन त्यात मी नेहमीच  हरत आलो
कालच्या युद्धातही तेच  झाले
पण ह्यावेळीस मात्र मी  माझ्या  प्रेमालाही गमावून आलो होतो  ...............

भेट अखेरची होती
ओळख मात्र जुनीच होती .............

ती तिच्या संसारात जगू पाहत होती
मी तिच्याविना दिवस  मोजत होतो
पण  माझ्यात जीव तिचा
एकट्यात नेहमीच मला आठवत रडत होती ..............

अशी माझी प्रेम कहाणी 
सुरु होण्याआधीच  श्वास सोडत  होती ...............
-
©प्रशांत डी शिंदे

दि .०१-१०-१३
« Last Edit: October 01, 2013, 12:12:11 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता


Mangesh bhujabl

  • Guest
Re: ती भेट अखेरची होती .........
« Reply #1 on: October 01, 2013, 01:47:08 PM »
 ;)