Author Topic: एकदाच भेटायला येशील का ?  (Read 1256 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
एकदाच भेटायला येशील का ?
« on: October 02, 2013, 10:48:05 AM »
सांग ना सखे मज एकदाच
भेटायला येशील का ?
आसुसलेल्या या नयनांवर तुझ्या
नजरेची जादू करशील का ?

नदीने भेटावे जसे बेभान होऊन त्या
सागरास तसं मिठीत माझ्या येशील का ?
सांग ना सखे मज एकदाच
भेटायला येशील का ?

वाट बघून बघून थकलो आता
प्रेतावर दोन फुलं चढवायला येशील का ?
सांग ना या वेड्याला स्मशानापर्यंत
तरी सोडवायला येशील का ??

सांग ना सखे मज एकदाच
भेटायला येशील का ?

एकदाच  भेटायला येशील का ?

@सतीश भूमकर.
« Last Edit: October 04, 2013, 09:50:54 PM by सतीश भूमकर »

Marathi Kavita : मराठी कविता