Author Topic: आता नको येऊस.....  (Read 1177 times)

Offline abhi manchekar

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
आता नको येऊस.....
« on: October 03, 2013, 05:32:57 PM »
आता नको येऊस.....

हल्ली तुझे भास वरचेवर होतात,
पण तुझे येणे काही होत नाही....
सुर अडखळत आहेत मनात,
अन् त्यांचे गाणे काही होत नाही...

ओसरला बरसून आता मुसळधार पाऊस,
एकटाच भिजलो मी, तू आता नको येऊस...

जुन्या सा-या आठवणी सोबतीस आहेत,
जुने काही क्षण विसरता येत नाहीत.....
कितीही म्हटले तरी ह्रदयावर,
नवे गालीचे पसरता येत नाहीत.......

उगाच भावनांची अवजड ओझी नको वाहूस,
वेदनेत मी जळतो, तू आता नको येऊस.....

जाता जाता तुला काही सांगेन म्हणतो,
तुझ्या सोबतची काही स्वप्ने अधुरीच राहीली....
तुझ्या मिठीत होतो मी एकेकाळी,
आता तुझ्या मिठीची जरूरीच राहीली.....

भरल्या डोळयांनी माझी अंत्ययात्रा नको पाहूस,
सुटली गाडी आयुष्याची, आता नको येऊस.....

अभिजीत मणचेकर....................


Marathi Kavita : मराठी कविता