Author Topic: रात्र रात्र ....  (Read 1252 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,270
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
रात्र रात्र ....
« on: October 07, 2013, 04:15:41 PM »
रात्र - रात्र

आठवणीचे धागे
सोडवू नकोस
गुंता मात्र वाढत राहील...
फाटक्या आयुष्याला
ठिगळ लावू नकोस
चिंध्याचा ढीगच होईल...

चिंध्याची उशी करशील?
डोकं टेकायला?

झोप येईल तुला...?

मग बसशील गोंजारत
जसा तुझा हात
मझ्या केसांवरून

नको ती सवय
लावून घेउस उगाच

माझ्यासारखी
उरी कवटाळण्याची...

रात्र ... रात्र©शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com - +919422779941

Marathi Kavita : मराठी कविता