तु असशीलही कदाचीत नसशीलही ..
तु असशीलही कदाचीत नसशीलही ..
एक ओळ असावी मात्र, तुझ्यासोबत लिहिलेली
कधीतरी नकोसं झाल की
खोल कुशीत घेणारी..
तु असशीलही कदाचीत नसशीलही
एक श्वास असावा फक्त, तुझ्यासोबत घेतलेला
माझा बंद पडला तर
काळजामधुन वाहणारा..
तु असशीलही कदाचीत नसशीलही
एक स्पर्श असावा तुझा फक्त, हळुवार हातांचा
जगाने दिलेल्या जखमांवरुन
मलम होऊन फिरणारा..
तु असशीलही कदाचीत नसशीलही
एक दाद असावी तुझी फक्त, माझ्या कवितेला दिलेली
शब्दच सुचणार नाहीत तेव्हां
नवी आशा देणारी..
तु असशीलही कदाचीत नसशीलही
पण आतुन एक हाक मात्र कायम असेन तुझी
काळीज चिरुन टाकणारा विरह असेनच तुझा
आणि त्या घावानंतरही
तुझ्यासाठी वाहणारी वेदना असेन..
तितकीच जिवंत आणी ताजी.. तुझ्या स्पर्शासारखी
आणी मागे असेन मी,
आपण मिळुन केलेल्या काही कविता, आणी
बोभाटा करणारी नवीन दाद.. माझ्या कवितेला ..
कुठेतरी मात्र ..
तु असशीलही कदाचीत नसशीलही .