Author Topic: रित्या पेल्यास विचार ..?  (Read 796 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
रित्या पेल्यास विचार ..?
« on: October 12, 2013, 05:12:00 PM »

नसण्याने सोबत तूझी,
किती एकाकी
मला वाटले होते ?

नीज येण्या अगोदर,
डोळ्यात कोणते
स्वप्न दाटले होते ?

उरातून कळ निघतांना,
हृदयातून रक्त
किती सांडले होते ?

रित्या पेल्यास विचार,
पितांना मदिरेसह
अश्रु किती होते ?© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941

Marathi Kavita : मराठी कविता