Author Topic: तिच्या मुखचंद्राची याद ​जागवून जातो  (Read 590 times)

Offline देवेंद्र

  • Jr. Member
  • **
  • Posts: 90
तिच्या मुखचंद्राची याद ​जागवून जातो
जाळीत काळीज माझी रात्र जागवितो

आज तो डौलाने विहरतो आभाळी
इथे एकटाच मी अन जणू रात्र काळी

तिच्या आठवांनी मन सैरभैर  होते
एक एक क्षण जीवाची घालमेल होते

जरी हलकीच जाणीव सुकलेल्या आसवांची 
मनी जागते छबी तिच्या बोलक्या नयनांची

पाहून हासतो मजकडे मग कोजागिरीचा चंद्रमा
आश्वासितो मज, सांगतो भेटेन पुन्हा चांद माझा

- देवेंद्र