Author Topic: कारण प्रेम हे असच असतं.....  (Read 1290 times)

कारण प्रेम हे असच असतं.....
« on: November 14, 2013, 11:10:09 PM »
या जगात आपलं कोणी नसतं,
जर हे मला अगोदर कळलं असतं.....

तर प्राण सोडला असता मी,
पण ???
खरं प्रेम कुणावर केलं नसतं.....

कारण ???

काय सांगू मी मित्रा तुला,
खरं तर प्रेम हे असच असतं.....

जे एका क्षणात होवून जातं,
थोडसं सुख खुप सारं दुःख देतं.....

अन् जाता जाता आयुष्य उध्वस्त करतं,
सुंदर जिवन कसं कवडीमोल ठरतं.....

विरहाच भयानक दुःख भोगावं लागतं,
आपल्याला जिवतंपणी मरावं लागतं.....

कारण ???

खरं प्रेम केलं जरी आपण,
आयुष्यात हाती काहीच लागत नसतं.....

उरतो फक्त जिवघेणा एकांत आपला,
कारण प्रेम हे असच असतं.....
 :'(   :'(   :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १४-११-२०१३...
सकाळी ०७,१६...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline niteshk

 • Newbie
 • *
 • Posts: 42
 • Gender: Male
Re: कारण प्रेम हे असच असतं.....
« Reply #1 on: November 18, 2013, 11:12:24 AM »
खूप छान
मनाला स्पर्श करणारी

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,265
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: कारण प्रेम हे असच असतं.....
« Reply #2 on: November 18, 2013, 12:01:27 PM »
खरं प्रेम केलं जरी आपण,
आयुष्यात हाती काहीच लागत नसतं.....

उरतो फक्त जिवघेणा एकांत आपला,
कारण प्रेम हे असच असतं.....


छान.....

swapnil12465465

 • Guest
Re: कारण प्रेम हे असच असतं.....
« Reply #3 on: November 18, 2013, 10:20:55 PM »
 :P ::) :-X ???

Offline दर्पण दिपक गोनबरे

 • Newbie
 • *
 • Posts: 14
 • Gender: Male
 • मराठी कविता... विचारांचा एक जल प्रवाह!!!
Re: कारण प्रेम हे असच असतं.....
« Reply #4 on: November 19, 2013, 07:33:10 PM »
कविता आवडली मला  :) ते गुलाबाचं फुल हि आवडलं, सुंदर.... खूप सुंदर.