Author Topic: तीच्या आनंदासाठी मी ही रडताना खोटे खोटे हसलो होतो.....  (Read 940 times)

प्रेमाच्या रंगात मी ही रंगलो होतो,
रात्र रात्र तिच्यासाठी मी ही जागलो होतो.....

ती माझीचं आहे म्हणुन,
क्षण क्षण मी ही तिच्यासाठी मनापासून झूरलो होतो.....

तीच्याशिवाय काहीचं नको होते मला,
कित्येकदा तिच्यासाठी मित्र-मैत्रिणीँशी नडलो होतो.....

ती मलाचं मिळवी आयुष्यभरासाठी म्हणुन,
कित्येकदा प्रार्थनेत मी ही देवापुढे नतमस्तक झालो होतो.....

तीचं माझी सखी व्हावी म्हणुन,
कित्येकदा देवाला मी ही खुप काही वाईट बडबडलो होतो.....

तीचं माझी आयुष्याची जोडीदार बनावी म्हणुन,
कित्येकदा जिवाला जिव देणा-या जन्मदात्यांशी मी ही भांडलो होतो.....

ती आली आणि सोडूनही गेली कायमची मला,
ती सोडून गेल्यावर गेल्यानंतरही मी ही ढसाढसा रडलो होतो.....

तीची पाणावल्या डोळ्यांनी शेवटची भेट घेत असताना,
तीच्या आनंदासाठी मी ही रडताना खोटे खोटे हसलो होतो.....

तीच्या आनंदासाठी मी ही रडताना खोटे खोटे हसलो होतो.....
:'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....