Author Topic: तूचं ना ती.....  (Read 1037 times)

तूचं ना ती.....
« on: November 21, 2013, 08:13:16 PM »
प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणीँनो,
ही कविता नसून माझ्या आयुष्यात घडलेली घटना आहे.....

तूचं ना ती.....

माझ्या मित्राच्या Status वर,
बेधडक Comment करणारी,
माझी मुलीँन बद्दल Comment पाहून,
माझ्याशी कडकडून भांडणारी.....

तूचं ना ती.....

माझी Comment खरी होती हे कळताचं,
मला Sorry बोलून माफी मागणारी,
मग मला Friend Ruqest पाठवून,
Plz मला Add कर ना बोलणारी.....

तूचं ना ती.....

माझ्याशी मैत्री करुन,
माझ्या मनात घर करणारी,
दररोज माझ्याशी Chatting करुन,
माझं डोकं पकवणारी.....

तूचं ना ती.....

माझ्या सोबत मनसोक्त,
तासनतास गप्पा मारणारी,
अरे ठेवणारे फोन आता असे बोलून,
पुन्हा माझ्याशी स्वतः काँल करुन बोलणारी.....

तूचं ना ती.....

मला दररोज फोन करुन,
नेहमी भेटायला बोलवणारी,
मी भेटायचं नाही बोललो म्हणुन,
खोटं खोटं माझ्यावर रागावणारी.....

तूचं ना ती.....

पहील्या भेटतीचं मला बघताचं,
माझ्यावर एकतर्फी प्रेम करणारी,
माझ्याशी बोलायला मिळावं म्हणुन,
Fb वर नेहमी Online राहणारी.....

तूचं ना ती.....

माझ्या प्रत्येक Post ला,
Like अन् Comment करणारी,
मला तुझ्या कविता खुप आवडतात,
असे मला नेहमी सांगणारी.....

तूचं ना ती.....

तुझ्या मैत्रिणीचं ऐकून,
माझ्याशी मैत्री तोडण्याची भाषा करणारी,
मग तुझी चुक कळताचं,
मला Sorry म्हणणारी.....

तूचं ना ती.....

मला स्वतः Propose करुन,
माझी Girlfriend होणारी,
मी आता फक्त तुझीचं आहे,
असे बोलून मला फसवणारी......

तूचं ना ती.....

मी प्रेम मान्य करताचं,
गालात गोड गोड लाजणारी,
मी I Love u बोलताचं,
लाजून I Love u Too बोलणारी.....

तूचं ना ती.....

माझ्या मनात घर करुन,
माझ्यावर आभाळा एवढे प्रेम करणारी,
माझ्यासाठी दिवस-रात्र,
मनापासून खुप खुप झूरणारी.....

तूचं ना ती.....

मी रागावून बोलताचं,
लहान मुलीसारखी मुळूमुळू रडणारी,
अशी चूक परत करणार नाही,
म्हणुन माझी माफी मागणारी.....

तूचं ना ती.....

माझ्या वाढदिवसाला कटकट करुन,
Birthday Trit देणारी,
मला काय Gift हवय म्हणुन,
माझ्या मागे लागणारी.....

तूचं ना ती.....

माझी साथ कधीचं नाही सोडणार,
असे खोटे वचन देणारी,
आणि Breakup करुन,
माझे मन मोडणारी.....

तूचं ना ती.....

आपल्या Breakup नंतर,
माझी आठवण काढून रडणारी,
का असे झाले रे आपले,
हे खोटे प्रश्न विचारणारी.....

तूचं ना ती.....

मला होळी ला Call करुन,
कसा आहेस रे विचारणारी,
माझा विचार सोड रे आता,
असे मला रडून सांगणारी.....

तूचं ना ती.....

माझी आठवण येताचं,
एकांतात ढसाढस रडणारी,
मी कोणीचं नव्हतो का तुझा,
हूंदके देत मनाला विचारणारी.....

तूचं ना ती.....

आपल्या Breakup नंतर,
माझं तोँड न पाहण्याच शपथ खाणारी,
अचानक मी भेटताचं माझ्या डोळ्यात,
पाहण्याची हिँमत ही न करणारी.....

तूचं ना ती.....

आपल्या दोघानच्या सुखासाठी,
लालबागच्या राजाकडे नवस करणारी,
आपले नाते असेच टीकावे म्हणुन,
गणपती बाप्पाला हात जोडणारी.....

तूचं ना ती.....

मी लिहलेल्या कवितान बद्दल,
तोँड भरुन कौतुक करणारी,
की आता तु काय मोठा कवि आहेस का,
अशी दोन तोंडी गोष्ट करणारी.....

तूचं ना ती.....

अगोदर माझ्या मनात राहून,
माझ्या नजरेत भरणारी,
की आता मलाचं तुझ्या नजरेत,
तुच्छ नजरेने वागणुक देणारी.....

तूचं ना ती.....

मला सात जन्म साथ,
निभावण्याची खोटे वचने देणारी,
की आता एक जन्मातचं,
माझी साथ सोडून जाणारी.....

तूचं ना ती.....

एकवेळ माझ्या प्रेम खातिर,
जिव देण्याची गोष्ट करणारी,
की आता मी मरण्याची,
आतुरतेने वाट पाहणारी.....

तूचं ना ती.....

नेहमी मोबाईलच्या स्क्रीनवर,
माझ्या Call ची वाट पाहणारी,
की आता माझा Call पाहताचं,
तो पटकन Cut करणारी.....

तूचं ना ती.....

माझ्याशी लग्न करायला,
घरातून पळायला तयार असणारी,
की आता माझाचं घरटं तोडून,
मला पुर्णपणे उध्वस्त करणारी.....

तूचं ना ती.....

माझ्या सोबत संसाराची,
गोड गोड स्वप्न पाहणारी,
की आता माझ्याचं स्वप्नांना तोडून,
मला कायमची सोडून जाणारी.....

तूचं ना ती.....

मला एक क्षण पाहण्यासाठी,
मनापासून तळमळणारी,
की आता माझ्याकडे पाहूनही,
न पाहील्यासारख करणारी.....

तूचं ना ती.....

मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट,
ध्यान देऊन ऐकणारी,
की आता माझा विषय निघताचं,
पटकन विषय बदलणारी.....

तूचं ना ती.....

माझ्यावर डोळे झाकून,
पुर्णपणे विश्वास ठेवणारी,
की आता माझा विश्वास तोडून,
कुणा दुस-याची होणारी.....

तूचं ना ती.....

मलाचं स्वतःचं सर्वस्व,
आणि अस्थित्व मानणारी,
की आता माझेचं अस्थित्व,
मला बदलायला भाग पाडणारी.....

तूचं ना ती.....

अगोदर मला जवळचा मित्र,
आणि जिवलग प्रियकर मानणारी,
की आता मी कोणीचं नव्हतो तुझा,
असे मला रडून सांगणारी.....

तूचं ना ती.....

माझ्यावर जिव लावून,
जिवापाड प्रेम करणारी,
की आता माझ्याचं जिवावर,
जिवघेण्या जखमा देणारी.....

तूचं ना ती.....

मला कोणी वाईट बोलल तर,
माझ्यासाठी दुसर्याँशी भांडणारी,
की आता माझ्याशीचं भांडूण,
दुश्मनीची भिँत उभी करणारी.....

तूचं ना ती.....

माझ्या प्रत्येक Msg ला,
पटकन Reply करणारी,
की आता माझा Msg पाहतचं,
तो जानुन बुजुन Delet करणारी.....

तूचं ना ती.....

या जगात गर्दीत असताना,
मला भिर भिर नजरेने शोधणारी,
की आता माझ्याशी नजर चुकवून,
न पाहता निघून जाणारी.....

तूचं ना ती.....

माझ्या प्रेमाला Timepass नको समजू,
असे मला समजवणारी,
की आता स्वतःचा Timepass करुन,
माझ्या प्रेमाला काळीमा फासणारी.....

तूचं ना ती.....

मला कधीचं सोडू नकोस रे,
असे भावूक होऊन सांगणारी,
की आता मला सोडून,
एकटं जगायला भाग पाडणारी.....

तूचं ना ती.....

माझ्यावर नजरेचे प्रेमळ तीर मारुन,
मला घायाळ करणारी,
की आता त्याच नजरेत,
कुणा दुस-याचाचं चेहरा भरणारी.....

तूचं ना ती.....

माझ्याशी लग्न करायला,
एका पायावर तयार असणारी,
की आता कुणा दुस-या सोबत,
घाईघाईत साखरपुडा उरकणारी.....

तूचं ना ती.....

मला आयुष्यभराचा जोडीदार म्हणुन,
मनाने पहीली पसंती देणार,
की आता कुणा दुस-या सोबत,
लग्नाचा कठोर निर्णय घेणारी.....

तूचं ना ती.....

माझ्या ह्रदयात नकळत उतरुन,
त्यात एकटीचं राहण्याचा हट्ट करणारी,
की आता त्याचं ह्रदयाचे तुकडे करुन,
कधीचं न मिटणा-या जखमा देऊन जाणारी.....

तूचं ना ती.....

मला प्रेमात असणा-या त्यागाचे,
महत्व पटवून सांगणारी,
की आता माझाचं त्याग करुन,
मलाचं पहीले प्रत्यक्षीत दाखवणारी.....

तूचं ना ती,
तूचं ना ती,
हो हो फक्त तूचं ती,
फक्त आणि फक्त ती.....

नोट - मित्रांनो आणि मैत्रिणीँनो,
कुणीही ही कविता Copy Paste करु नका.....
आणि करणार असालाचं,
तर कविच्या नावासोबत Copy करा.....
कारण ही कविता नसून
खरं प्रेम करुनही धोका मिळालेल्या,
प्रियकराच्या मनातल्या व्यथा आहेत...
ह्या कवितेत कविचा प्राण आडकलेला आहे.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता