Author Topic: माझी ही आठवण, येईल तूला मी मेल्यावर.....  (Read 1069 times)

किती जिवापाड प्रेम,
होते माझे तुझ्यावर,
हे नक्कीचं कळेल तुला,
तुझी चूक कळल्यावर.....

किती त्रास झाला,
मला किती रडलो,
हे नक्कीचं कळेल तूला,
कुणाच्या विरहात रडल्यावर.....

का कसे आणि किती,
प्रेम केले मी तुझ्यावर,
हे नक्कीचं कळेल तूला,
कुणाला ह्रदय दिल्यावर.....

किती आणि कसा,
जाळतो एकांत मला,
हे नक्कीचं कळेल तूला,
एकांतात कुणासाठी झूरल्यावर.....

मी या जगात,
तुझ्याशिवाय कसा जगतोय,
हे नक्कीचं कळेल तूला,
स्वतःला सोडून दुस-यासाठी जगल्यावर.....

माझे आयुष्य बरबाद करुन,
खूश आहेस तू,
पण ???
तू ही खूप पसतावशील त्यावेळी,
जेव्हा तूला कोणीतरी सोडून गेल्यावर .....

मी तर मरत मरतचं,
जगत आहे तुझ्यासाठी,
पण ???
माझी ही आठवण येईल,
तूला मी मेल्यावर.....

माझी ही आठवण येईल
तूला मी मेल्यावर.....
:'(   :'(   :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....