Author Topic: खरं प्रेम नशिबानेच मिळत असतं.....  (Read 1447 times)

कितीही दुःख असले आयुष्यात,
मनाच्या जखमांना लपवावंच लागतं.....


लावूनी सुखाचा मुखवटा चेह-यावर,
तरी खोटं खोटं हसावंच लागतं.....

विसरावं स्वतःच्या अस्थित्वाला,
विरहाच दुःख सोसावंच लागतं.....

कसं असतं ना आयुष्य हे,
आपल्याला हवं ते मिळत नसतं.....

अन्...!!

खरं तर जे नको असतं,
नेहमी तेच मिळत असतं.....

असेच असतं प्रेम हे,
ते प्रत्येकाला मिळत नसतं.....

ज्याला खर प्रेम होतं,
त्याला ते कधीच कळत नसतं.....

कारण ???

सर्व काही मिळवता येतं स्वबळावर,
पण,
खरं प्रेम नशिबानेच मिळत असतं.....

खरं प्रेम नशिबानेच मिळत असतं.....
 :'(    :'(     :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २३-११-२०१३...
दुपारी ०५,५१...
© सुरेश सोनावणे.....