Author Topic: तुझ्याविणा जगावसं वाटत नाही.....  (Read 929 times)

का रे असे दुःख दिलेस,
जे मला सहन होत नाही.....

का रे असे मला छळलेस,
जे मनाला मला सावरता येत नाही.....

का रे अशा जखमा दिल्यास,
ज्या काहीही करता भरत नाही.....

का रे असा खेळ मांडलास,
जो अजुनही संपवता आला नाही.....

का रे असा भयानक विरह दिलास,
ज्याच्या यातना मला सहन होत नाही.....

का रे असा धोका दिलास,
ज्याचा मी विचारही केला नाही.....

का रे असे खोटे प्रेम केलेस,
जे प्रेम मला अजुन समजले नाही.....

का रे असे अल्पजिवी वचन दिलेस,
जे तुला मनापासून निभावत आले नाही.....

तु कसा ही असो,
तुझ्याशिवाय मला कोणचं आवडत नाही.....

खरचं रे शोन्या,
तुझ्याविणा जगावसं वाटत नाही.....

तुझ्याविणा जगावसं वाटत नाही.....
:'(   :'(    :'(


_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....