Author Topic: तरीही का जगतोय मी, एक एकटा तुझ्याविणा.....  (Read 931 times)

चंद्र जसा जगतोय,
एकटा चांदणीविणा,
तसेच मी ही जगतोय,
एक एकटा तुझ्याविणा.....

कसलीच नाही अपेक्षा माझी,
ना बाळलगी कोणतीच ईच्छा,
तरीही का जगतोय मी,
एक एकटा तुझ्याविणा.....

जसा विझतो दिवा,
होतो सुना वातीविणा,
तरीही का जगतोय मी,
एक एकटा तुझ्याविणा.....

आता जगणंच खुंटलय,
माझं खरं तर तुझ्याविणा,
तरीही का जगतोय मी,
एक एकटा तुझ्याविणा.....

नाही राहीली भावना मनी आता,
सोसू किती असाह्य वेदना,
तरीही का जगतोय मी,
एक एकटा तुझ्याविणा.....

माझे हे भयानक दुःख,
सांगू तरी मी कुणा,
तरीही का जगतोय मी,
एक एकटा तुझ्याविणा.....

विराहचे घाव हे मिटले नाही,
खोटा ठरला प्रेमाचा खेळ जुना,
तरीही का जगतोय मी,
एक एकटा तुझ्याविणा.....

तरीही का जगतोय मी,
एक एकटा तुझ्याविणा.....
:'(     :'(     :'(

_____/)___/ )______./¯”"”/ ’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०४-१२-२०१३...
दुपारी ०५,३२...
© सुरेश सोनावणे.....