Author Topic: तुझ्या आठवणींना नाहीच आठवणार मी.....  (Read 1024 times)

आता तुझ्याशी नाहीच बोलणार मी,
मनाला माझ्या दगड करणार मी,
नको तुझे ते खोटे प्रेम मला,
आता तुझ्यासाठी नाहीच झूरणार मी.....

शक्य होईल तर विसरुन जाईल तुला,
आठवणीत तुझ्या नाहीच रडणार मी,
पाहीले माझ्यावरचे तुझे खरे प्रेम,
आता स्वतःला नाहीच फसवणार मी.....

या दुःखातून सावरेल कसा बसा,
अस्थित्व माझे नाहीच विसरणार मी,
आता फक्त तिरस्कार करेल तुला,
तुझे तोँड नाहीच पाहणार मी.....

आता नको मला सोबत तुझी,
आयुष्याच्या वाटेत एकटाच चालणार मी,
आता नाही होऊ देणार घाव ह्रदयावर,
मरण यातना नाहीच सोसणार मी.....

आता साठवून ठेवेल भावना माझ्या,
दोन प्रेमळ शब्दानसाठी नाहीच तरसणार मी,
आता राहील फक्त परखाच तुला,
आपलेपण नाहीच जतवणार मी.....

आता हवे तर हसत हसत संपवेल स्वतःला,
विरहात तुझ्या नाहीच तडफडणार मी,
आता जगेल किँवा मरेल,
देवालाही दोश नाहीच देणार मी.....

शेवटी घेतली शपथ आज,
दूराव्यात नाहीच जळणार मी,
आता असाच जगेल रडत खडत,
तुझ्या आठवणींना नाहीच आठवणार मी.....

तुझ्या आठवणींना नाहीच आठवणार मी.....
:'(     :'(     :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०६-१२-२०१३...
दुपारी ०४,१९...
© सुरेश सोनावणे.....